जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील शिरसोली शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुची निर्मिती रोखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी सात ठिकाणी दारु तयार करणाऱ्या भट्टया उद्ध्वस्त केल्या, ज्यात एकूण ११,४६० लिटर गावठी हातभट्टीची दारु व कच्चे रसायन यांचा समावेश होता. या कारवाईची एकूण किंमत सुमारे ५ लाख ४३ हजार रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली शिवारातील जंगलात या दारुची अवैधरित्या निर्मिती केली जात होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कार्यवाही गुरुवारी पहाटे केली. या पथकात सफौ अधिकार पाटील, पोना प्रदीप पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, शुध्दोधन ढवळे, गणेश ठाकरे, तुषार गिरासे, नाना तायडे, किरण पाटील, मंदार पाटील, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. ही कारवाई स्थानिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वपूर्ण ठरली असून, अवैधरित्या दारु निर्मितीच्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कटिबद्धता स्पष्ट करते.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा