Top News

जळगावातील कोल्हे हिल्स साईधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील साईधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पाच दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाला विविध धार्मिक विधी, सत्संग, भजन, कीर्तन व प्रवचनांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात भव्य पुजा व अभिषेकाने होणार असून, दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, धार्मिक प्रवचनांचे आयोजनही करण्यात आले आहे, ज्यामुळे भाविकांना अध्यात्मिक आनंद मिळणार आहे.
मंदिर व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व समाजातील एकता व सहभावनेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन केले आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा.

कार्यक्रमाची रूपरेषा 
दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार, दि. १७ रोजी भजन संध्या व गुणगौरव कार्यक्रम, दि. १८ रोजी खाद्य पदार्थाचे स्टॉल व किड्स खेळाचे प्रकार याठिकाणी उपलब्ध राहणार, दि. १९ रोजी महाप्रसाद (भंडारा) आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. २० रोजी सायंकाळी महिलांसाठी खेड पैठणीचा (होम मिनिस्टर) कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने