Top News

बोजा चढविण्यासाठी १ हजार रुपयांची लाच भोवली, तलाठी, पंटर एसीबीच्या जाळ्यात


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I  तालुक्यातील लोणी बु. गावात शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे व खाजगी पंटर शरद प्रल्हाद कोळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावने अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार यांच्या कुटुंबियांच्या नावे लोणी बु. येथे ६.५ एकर शेत जमीन आहे. कर्ज घेण्यासाठी या शेत जमिनीवर ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी तलाठीस भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची चर्चा केली असता, तलाठ्याने त्यांच्याकडून १००० रुपयांची लाच मागितली. यामध्ये ४ उताऱ्याचे २०० रुपये प्रति उतारा आणि इतर कामांचे २०० रुपये समाविष्ट होते. खाजगी पंटर शरद कोळी याने या लाच मागणीस प्रोत्साहन दिले असून, लाच रक्कम त्याच्या फोन पे अकाउंटवर टाकण्यास सांगितले. तक्रारदारांनी या बाबतीत पारोळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या कारवाईत जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, स्मिता नवघरे आणि इतर टीम सदस्यांचा सहभाग होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने