जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I घराच्या कंपाऊंडमध्ये बेकायदेशीररित्या घरगुती व व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा वापर केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला मिळताच सर्व लागणार साथ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दि. 29 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सादीक सिराज पिंजारी (वय-41, रा. मलीक नगर, शिरसोली, जळगाव) याने घराच्या कंपाऊंडमध्ये बेकायदेशीररित्या घरगुती व व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा साठा केला आहे.
दुपारी 12.00 वाजता संबंधित ठिकाणी पोचून सादीक सिराज पिंजारी याला गॅस सिलेंडर, अॅपे रिक्षा (क्रमांक MH-19 BM 2784) आणि गॅस भरण्याची मशीनसह पकडण्यात आले. एकूण 73 गॅस सिलेंडर आणि अन्य मुद्देमालाची किंमत 5,29,600/- रुपये आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व इतर अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत. या कारवाईत पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांचे सहकार्य लाभले आहे.

टिप्पणी पोस्ट करा