Top News

माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते व माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांचा वाढदिवस आज त्यांच्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी मनसेचे शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, उप शहर संघटक सागर भाऊ पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने जयप्रकाश बाविस्कर यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीकृष्ण मेंगडे, सागर भाऊ पाटील, खुशाल ठाकूर, विशाल जाधव, अक्षय लहाने, योगेश राठोड, अक्षय राठोड, विशाल शिंदे, ओम राय यांच्यासह इतर पदाधिकारी त्यांच्या घरी गेले व त्यांना वयाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मनसेने जयप्रकाश बाविस्कर यांना त्यांच्या कार्यासाठी कौतुक करत, त्यांचे भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पार्टीचे विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील राजकीय वातावरणात मनसेच्या वर्धापनाची कामगिरी निश्चितच मोलाची ठरेल, असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने