Top News

युवासेनेतर्फे सिनेट निवडणुक निवडून आल्याबद्दल जळगावात जल्लोष

 


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज युवासेना जळगाव महानगर तर्फे मुंबई येथे झालेल्या विद्यापीठ अधिसभा निवडणूकीत मिळालेल्या यशा बद्दल जल्लोष साजर करण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिनेट निवडणुकीत १० पैकी १० ही जागांवर यश संपादित केले.

या अनुषंगाने आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय महानगरपालिका इमारत बाहेर येथे फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हा युवा अधिकारी विशाल वाणी, विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी अमित जगताप, महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, जिल्हा चिटणीस अंकित कासार,उप महानगर युवा अधिकारी राहूल शिंदे, गजेंद्र कोळी, मयूर अण्णा गवळी, राजकिरण चौधरी, झाईद पटेल , निलू जोशी, पंकज जोशी, पवन कोळी,युवासैनिक सौरभ चौधरी, वैभव नेहते, गिरीश पाटील, युवती सेनेच्या दिपाली बाविस्कर, यश सपकाळे, अजिंक्य कोळी, देवा पाटील,ओम कोळी  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने