Top News

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जळगावमध्ये ७० टन निर्माल्य संकलन जमा

श्री सदस्यांनी शेवटपर्यंत सेवा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पर्यावरण रक्षण आणि नदी स्वच्छतेसाठी सतत कार्यरत असलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने गणेश विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. यंदा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी जळगाव शहरात तब्बल ७० टन निर्माल्य संकलित केले.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य नदीमध्ये विसर्जित केले जाते, त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढते. या पार्श्वभूमीवर डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून दरवर्षी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत, विसर्जनाच्या दिवशी विविध ठिकाणी स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलन केंद्रे उभारली. यामध्ये पुष्प, फळे, पत्री, नारळ इत्यादींचे संकलन करून ते पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापित केले जात आहे.

या कार्यात प्रतिष्ठानचे ११३८ श्री सदस्यांचा सहभाग होता., स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण रक्षणासह नद्यांचे प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

यामध्ये ट्रॅक्टर २७, छोटा हत्ती ४, बोलेरो गाडी ४, मालवाहू रिक्षा ४ असे एकूण ४४ वाहन फेऱ्यामध्ये दाखल होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने