Top News

जळगावात २५ वर्षीय तरुणाला मारहाण, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल



जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I उसनवार दिलेले दोन लाख रुपये लवकर परत कर, असे बोलल्याच्या कारणावरून दिनेश मांगीलाल ओझा (२५, रा. प्रजापत नगर) यांना तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री प्रजापत नगरात घडली.

याप्रकरणी गुरुवारी (१९ सप्टेंबर) तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केटरिंग व्यावसायिक दिनेश ओझा यांनी उस्मानिया पार्कमधील एकाला उसनवारीने दोन लाख रुपये दिले आहे. बुधवारी ओझा यांनी लाख रुपये मला लवकर परत कर, असे सांगितले. त्यावरून तीन जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी दिनेश ओझा यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने