Top News

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे पर्यावरण पूरक उपक्रम

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन यानिमित्ताने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव गणेशघाट जळगाव येथे निसर्ग व सामजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ व नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेतर्फे राबविण्यात आला. 

निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये तसेच परिसरात प्रदूषण होणारे रोखण्याच्या दृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणप्रेमीं व नारीशक्ती ग्रूपच्या महिलांनी निर्माल्य संकलन सकाळी ८ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत केले. या कालावधीत ३ ट्रॅक्टर निर्माल्य संकलन करण्यात आले. नारीशक्तीने श्रमदान करून श्री गणेश विसर्जनासाठी अनमोल सहकार्य केले. या प्रसंगी नारीशक्तीच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांचे कौतुक भाग्यश्री महाजन, प्रियंका देसले तसेच उपस्थित नागरिकांनी केलें. 

यावेळी मनिषा पाटील, ज्योती राणे ,किमया पाटील, निता विसावे,रेणुका हिंगु, हर्षाली तिवारी आशा मौर्य ,नेहा मौर्य, योगिता बाविस्कर, मंजुषा अडावदकर, मरियम बुगडवाला, हर्षा गुजराती, विजया पांडे उपस्थित होते.या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने