पोलीस बंदोबस्त व सुरक्षा रक्षक तैनात
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येत आहे. सर्व मंडळांनी गणपती बाप्पाचा समारोपसाठी मेहरुन तलाव याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. याठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रशासनाने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.
१७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रभर गणेश विसर्जन होत आहे. या दहा दिवसांच्या उत्सवाचा समारोप म्हणून अनेक ठिकाणी गणपतींचे मोठ्या जल्लोषात विसर्जन केले जात आहे. जळगावात मोठ्या मंडळांसह विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आज निघणार आहेत, ज्यामध्ये असंख्य भाविक सहभागी होणार आहेत.
जळगाव पोलिसांनी सुरक्षिततेसाठी विशेष वाहतूक व्यवस्थापन केले आहे, काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत व इतर ठिकाणी ही नियम लागू केले आहेत. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची सूचना देखील देण्यात आली आहे. नागरिकांना खासगी वाहने टाळून सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन केले आहे, कारण विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी डीजेवर बंदी असून, मंडळांनी पारंपारिक ढोल-ताशांचा वापर केला आहे, तसेच काही ठिकाणी लाईव्ह संगीताचा वापर केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा