जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ एवं भारतीय जैन संघटना जळगाव शहर शाखा आयोजित व महावीर कॉमर्स प्रायोजीत जळगाव येथील सकल जैन समाजातील १० वी, १२ वी, CA,DR,MBA आदि परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा दादावाडी जैन मंदिर या ठिकाणी सानंद संपन्न झाले.
समारोह प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथि अनुभूति शाळा यांचे संचालिका निशा जैन, महावीर कॉमर्सचे नंदलाल गादिया, बीजेएस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनय पारख, खान्देश विभाग अध्यक्ष अशोक श्रीश्रीमाळ, शहर शाखा अध्यक्ष उदय कर्णावट, महिला शाखा अध्यक्षा शलाका बनवट, हितेश संकलेचा, दीपा देडीया आदी उपस्थित होते.
नमस्कार महामंत्र पठनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,उपस्थित अतिथि यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. दीपा देडिया यांनी स्वागत गीत व प्रस्तावना दिली तर बीजेएसची माहिती विनय पारख यानी दिली. निशा जैन व नंदलाल गादिया यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन पर भाषण केले. त्यानंतर उदय कर्णावट, नंदलाल गादिया, निशा जैन, विनय पारख, हितेश संकलेचा, दीपा देडिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन श्रद्धा देडिया यांनी केले. दुर्गेश चोरडिया यांच्या आभार प्रदर्शाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी अरिहंत जैन, विनय दुगड, समकित जैन, दुर्गेश चोरडिया, हितेश संकलेचा, हर्षल कोटेचा, संजय भंसाली शलाका बनवट, सुहानी सुराणा, निकिता कांकरिया, श्रद्धा देडिया आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा