अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू बांधवांचा निषेध
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजात आक्रोशाची लाट पसरलेली दिसत आहे बांगलादेशमध्ये अतिशय क्रूरपणे माता बहिणींच्या अब्रूवर हात टाकले जात आहेत. मठ मंदिर हिंदूंची प्रार्थना स्थळे उध्वस्त केली जात आहे. या सर्व घटनेचा निषेध म्हणून आज जळगाव जिल्ह्यातील सकल हिंदू समाज एकमताने रस्त्यावर उतरलेला आहे.
सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलानी मार्केट, बि.जे मार्केट , दाना बाजार , गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा ,भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय , कोचिंग क्लासेस , फुटपाथ विक्रेते, सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एकत्रित आलेले आहे.
*बंद ची सुरुवात भवानी मातेची आरती करून झाली*
सकाळी साडेनऊ वाजता सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील लोक एकत्रित जमून भवानी मातेची आरती करण्यात आली त्यानंतर सकाळी 10.30 वा. अतिशय शांततेत तीन तीन लाईनीमध्ये तिथून मोर्चाला सुरुवात झाली.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्गाचा देखील समावेश होता मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक - दाना बाजार-टॉवर चौक शिवतीर्थ हेडगेवार चौक स्वातंत्र्य चौक तेथून कलेक्टर ऑफिस या मार्गाने हजारोच्या संख्येने मोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकला.
*जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संबोधन*
जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले.
" आज जी परिस्थिती बांगलादेशात होत आहे तीच परिस्थिती भारतात व्हायला वेळ लागणार नाही. यासाठीच या देशातला हिंदू हा जातीपातीमध्ये वर्ग न होता एकत्रितपणे संघटित राहणं खूप गरजेचं आहे"
*महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन द्वारे मागणी*
१) भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी.
२) बांगला देशातील भयावह परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्या.
३) गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिक ते मुळे देशात असे कृत्य घडताना निदर्शनात येत आहेत या अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याद्वारे निवेदन सादर करण्यात आले निवेदन सादर करताना महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, ह.भ.प गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प दीपक महाराज, विहिंप चे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, रा.स्व.सं विभाग कार्यवाह अविनाश नेते , शहर संघ चालक उज्वल चौधरी , राकेश लोहार, अनिल अडकमोल , अमित भाटिया, डी. एन. तिवारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा