Top News

अनुष्का सेवाभावी संस्थेने जळगावात केला १००० वृक्ष लावण्याचा संकल्प

विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केले वृक्षारोपण 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अनुष्का सेवाभावी संस्था जळगावच्यावतीने आज दि. २४ रोजी जळगाव शहरातील समता नगर परिसरातील पठाण बाबा टेकडी दर्ग्याजवळ १००० वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. यावेळेस वड, कडु निंब, पिंपळ आदी वृक्षांची रोपाची लागवड करण्यात आली.

ग्लोबल वार्मिंगचा विचार करता जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड केली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, सुमित्रा अहिरे राज्य बहुजन क्रांती मोर्चा, प्रमोद इंगळे, बहुजन वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष, मोहन शिंदे, भारत मुक्ती मोर्चा महासचिव., बिरुदेव व्हडगर, राज्य सचिव बहुजन कर्मचारी संघटना, कल्पेश मोरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी,भीमराव सोनवणे रिपब्लिकन पार्टी कामगार आघाडी तसेच चित्रपट कलावंत सुनील भटकर, विकी बागुल, ॲड. कबीर म्हसदे, युनूस पठाण, अविनाश तायडे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. 

अनुष्का सेवाभावी संस्थेने १००० वृक्ष लावण्याचा संकल्प केलेला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचा वृक्ष लागवड करण्याकडे सध्या कल वाढलेला आहे. वृक्ष लागवड हि सामान्य लोकांची चळवळ व्हायला हवी, असे मान्यवरांनी या वेळेस मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने