बनवा आपला सुंदर शाळा आणि तब्बल ५१ लाखांचे बक्षीस मिळवा!
जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाचा दुसरा टप्पा राज्यात सुरू झाला आहे. यात उत्कृष्ट ठरलेल्या शाळांना तालुका ते राज्य पातळीपर्यंत १ ते ५१ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. गेल्यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंमलात आणली होती. याच योजनेचा हा दुसरा टप्पा आहे. या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील शाळांकडून तयारी सुरू असल्याने जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे.
२०२४-२५ मध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' टप्पा दोन है स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमासह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारात होता. त्या अनुषंगाने अंमलबजावणी सुरू आहे. तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे.
या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन अध्ययन धोरण अंमलबजावणी ७४ गुण व शैक्षणिक संपादकासाठी ४३ गुण राहणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा