जिल्हा क्रीडा संकुलाच्या समस्यांबाबत जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील जिल्हा क्रीडा संकुल हे अनेक युवा खेळाडूंचे प्रशिक्षण आणि स्पर्धा घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे स्थान आहे. जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाची परिस्थिती बिकट झाली आहे,त्यामुळे येथील खेळाडू आणिप्रशिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी निधीची आवश्यकता असून या समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, खुशाल ठाकूर इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती
टिप्पणी पोस्ट करा