Top News

जळगाव शहराच्या भाजप उमेदवारीसाठी रोहित निकम मैदानात?

पक्षांमध्ये दोन गट पडले? 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आतापासून भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. जळगाव शहर मतदार संघासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी काही दिग्गज नेते मंडळी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावत असल्याचे समोर येत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठविधीतज्ञ उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांनी भाजपने जर संधी दिल्यास सोने करणार अशी भूमिका घेतल्याने जळगाव शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. 

देशातील लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांना लोकसभेची संधी दिली होती. मात्र त्यांचा मतदारसंघात पराभव झाल्याने आता रोहित निकम जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याने शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. रोहित निकम हे देखील भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत असल्याचे समोर येत आहे. 


माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे दावेदार 
शहराच्या राजकारणात भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते व माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे हे देखील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याने ते गेल्या अनेक वर्षापासून मतदार संघातील विविध समस्या व सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन जोरदार कामे सुरू केले आहे. त्यामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा कोळी समाजाला संधी मिळेल का? असा प्रश्न देखील जळगाव शहरात उपस्थित होत आहे. डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे यांचा भाजपमध्ये मोठा चाहता वर्ग आहे तर जळगाव शहरातील विविध प्रभागात त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमातून देखील अनेक कार्यकर्ते त्यांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जुळून आले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघाचे चित्र जरा वेगळे असू शकते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने