जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची देणार का शपथ?
जळगाव अपडेट न्यूज, प्रतिनिधी I गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदन द्यायला आलेल्या एका सरपंचाला गुटखा खात असल्याचे समजतात, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोजवळ नेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यात तरुणाला व्यसनमुक्त होण्याची शपथ दिली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीय सहाय्यक कक्षातील एक कर्मचारी भर दिवसा जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर तंबाखू बनवीत असताना जळगाव अपडेट न्यूजच्या छायाचित्रकाराने फोटो काढताच त्या कर्मचाऱ्यांनी लागलीच तेथून पाय काढला.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे नेहमीच व्यसनमुक्तीसाठी अनेक उपाय योजना राबवित असतात. मात्र त्यांच्याच स्विय सहाय्यक कक्षातील एक कर्मचारी भर दिवसा कार्यालयात व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालना बाहेर तंबाखू सेवन करत असताना नेहमी अनेकांच्या नजरेस पडतो. मात्र बडा अधिकारी असल्याने कोणीही त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करत नाही मात्र आज अचानक मीडियाच्या कॅमेरामध्ये त्या कर्मचाऱ्याचे छायाचित्र टिपल्याने मोठी खळबळ उडाली होती.
काय घडली घटना
आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी ४ ते ५ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी आपल्या दालनात असताना स्वीय सहाय्यक कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या दालनाबाहेर येत खिशातून एक तंबाखूचे पाकीट काढून चोळत असताना जळगाव अपडेट न्यूजचे छायाचित्रकार यांनी अचूक छायाचित्र टिपले असता, त्यांनी लागलीच आपल्या हातात असलेली तंबाखू खाली फेकून दिली व या ठिकाणाहून काढता पाय घेतला. जर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मागील आठवड्यात निवेदन द्यायला आलेल्या तरुणाला व्यसनमुक्तीची शपथ दिली होती तर मग आपल्या स्विय्य सहाय्यक कक्षातील कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शपथ देणार का? हा प्रश्न सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात चर्चिला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा