Top News

जागतिक महिला दिनानिमित्त रेवे गुर्जर माहेर महिला मंडळाचा भव्य कार्यक्रम; ५०१ महिलांचा सन्मान

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रेवे गुर्जर माहेर महिला मंडळाच्या वतीने स्त्रीच्या सामर्थ्य, कर्तृत्व आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी “खेळ पैठणीचा”, विविध मनोरंजक गेम्स, आरोग्य तपासणी शिबीर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ५०१ महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला सशक्तीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला जामनेर नगर परिषद नगराध्यक्ष साधनाताई महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे, संध्याताई पाटील, चारुताई पाटील, तेजल दिदी, स्वाती पाटील, नंदा पाटील, मंदा पाटील, भावना महाजन यांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.

माहेर महिला मंडळाच्या अध्यक्षा शैलाताई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना पाटील, जयश्री चौधरी, मंदा पाटील, भारती पाटील आणि पूजा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने