Top News

छत्रपती संभाजी नगर येथील खटोड फार्म येथे १ व ३ मार्च रोजी भव्य प्री-होली सेलिब्रेशन

छत्रपती संभाजीनगर, निखिल वाणी I खटोड फार्म्स, कारकीनगाव (ढोरकिन, कचनेर रोड, पैठण रोड) यांच्या वतीने दिनांक १ मार्च व ३ मार्च २०२६ रोजी भव्य प्री-होली सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ होळी पार्टीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबासाठी आनंदोत्सवाचे स्वरूप धारण करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या प्री-होली उत्सवात रंगीबेरंगी फुलांची उधळण, पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) होळी, पारंपरिक ढोल-ताशांचा जल्लोष, आकर्षक रेन डान्स, स्विमिंग पूल पार्टी यांसह ७० हून अधिक विविध मनोरंजनात्मक उपक्रमांची मेजवानी उपस्थितांना अनुभवता येणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित उपक्रमांची आखणी करण्यात आली असून, कौटुंबिक वातावरणात आनंद लुटता येईल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

उत्सवात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांसह चायनीज व जैन फूडचेही पर्याय उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय विविध कलावंतांची सादरीकरणे, मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सुरक्षितता, स्वच्छता आणि शिस्त यांना प्राधान्य देत हा प्री-होली उत्सव साजरा केला जाणार आहे. मर्यादित प्रवेश व्यवस्था ठेवण्यात आल्याने इच्छुकांनी वेळेत पासेस बुक करावेत, असे आवाहन आयोजक श्री. रविंद्र खटोड यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रंगोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने