जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाला प्राधान्य देणारा एक अनोखा कार्यक्रम जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्नीशिखा” महिला ग्रुपच्या वतीने प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत असून, येत्या २२ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच मासिक पाळी आणि इतर आरोग्य विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात प्रथमच असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नर्सेस आणि डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. डॉक्टर निलेश चांडक, डॉक्टर सीमा पाटील, डॉक्टर पूजा सोमानी, डॉक्टर प्राची महाजन, डॉक्टर नितीन विसपुते, डॉक्टर अविनाश खेलवाडे, प्रा. वासुदेव पाटील, डॉक्टर श्रद्धा राणे, डॉक्टर शीतल पाटील, सौ. जागृती येवले, सौ. तृप्ती कांकरिया, सौ. युगंधरा सोळुंके, डॉक्टर अवधूत चौधरी आणि डॉक्टर रुकसाना खान यांना ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा