Top News

चिमणी दिवसानिमित्त ४०० परळ वाटप; पक्षी संवर्धनासाठी जळगावात अनोखा उपक्रम

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने शहरातील काव्यरत्नावली चौकात पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याच्या ४०० परळांचे वाटप करण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासत असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमातून नागरिकांना आपल्या घराजवळ, गच्चीवर किंवा अंगणात परळ ठेवून चिमण्यांसह इतर पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे यांनी मनोगतात चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, ग्रीन सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील, नगरसेवक नितिन बरडे, डॉ. विनोद बाविस्कर तसेच वंदना मंडावरे, आशा मौर्य, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, हर्षा गुजराथी, नेहा जगताप, राधिका पाटील, स्मिता पाटील, पूजा हिंगु, पूर्वी शाह, जानवी जगताप, गौरव वनरा, किशोर पाटील आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी “पाणी ठेवा, चिमण्या वाचवा” असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने