जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नागझरी शिवारातील गिरणा नदीकाठी प्रसिद्ध नागाई-जोगाई मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून पैसे चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी मंदिराच्या मागील लोखंडी चैन गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून देवीच्या मूर्तीवर ठेवलेले चांदीचे छत्र व रोख रक्कम लंपास केल्याची बाब लक्षात आली.
मिळालेल्या माहितीनुसार जळगावापासून थोड्याच अंतरावर असलेले नागझरी येथील प्रसिद्ध मंदिर नागाई-जोगाई येथे दि. २५ रोजी भरदिवसा सकाळच्या सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली. त्यांनी प्रवेश द्वाराला असलेले साखळी तोडून आत प्रवेश करून मंदिरामध्ये असलेली दानपेटी फोडून व महादेवाच्या पिंडीवर असलेले चांदी या धातूची वस्तू व ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा