Top News

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अंत्ययात्रा काढून केला भाजपने निषेध

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भाजपच्या जुने वसंत स्मृती कार्यालयापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकृतीची तिरडी तयार करून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरडीवर त्यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्व महेश चौधरी यांनी केले.

या अंत्ययात्रेला आमदार सुरेश भोळे, राजू मामा, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महापौर दिपमाला काळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, तसेच राहुल वाघ, नितीन इंगळे, राजेंद्र मराठे, आनंद सपकाळे, मनोज भांडारकर, मुकुंद मेटकर, चंदू महाले, अजित राणे, निलू आबा तायडे, विनोद मराठे, प्रकाश पंडित आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि तिरडीला खांदा दिला.

अंत्ययात्रा टॉवर चौकात पोहोचल्यावर तेथे प्रतीकात्मक कार्यक्रम पार पडला. यावेळी मंगलाताई बारी व महिला कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आंदोलनात सहभाग नोंदविला.

या आंदोलनात भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाद्वारे संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने