Top News

दुचाकी पंचरचा फायदा घेत डिक्कीतून ८ लाखांची रोकड लंपास; बसस्थानकासमोर घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील नवीपेठ परिसरात जुन्या बसस्थानकासमोरील गल्लीत बुधवारी (दि. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून त्यापैकी ८ लाख रुपये लंपास करण्यात आले. सुदैवाने २ लाख रुपये डिक्कीतच शिल्लक राहिले.
माहितीनुसार, मक्तेदार मयुर रवींद्र चौधरी यांनी मजुरांचे वेतन देण्यासाठी आपल्या सुपरवायझर प्रेम महारू जाधव यांना बँकेतून रोकड काढण्यास सांगितले होते. जाधव यांनी बँकेतून १० लाख रुपये काढून ती रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. मात्र काही अंतरावरच दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी जवळील पंक्चर दुरुस्तीच्या दुकानात दुचाकी लावली.

दुचाकी दुरुस्त होत असताना जाधव समोरील नाश्त्याच्या दुकानावर गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने डिक्की उघडून ८ लाख रुपये चोरून नेले. जाधव परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी तसेच एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यामध्ये चार संशयित व्यक्ती दुचाकीवरून जाताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रेम जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने