जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. आदरणीय दादांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार व राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
राज्यातील जनता आपल्या प्रश्न-अडचणी व तक्रारी घेऊन दादांच्या दरबारी जात असे. दादा जनतेची कामे मार्गी लागेपर्यंत त्या समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत असत. त्यांच्या अकाली जाण्याने राज्यातील जनता पोरकी झाल्याची भावना जनसेवा विचारधारा फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
दादांची दैनंदिन कामाची सुरुवात पहाटे ५ वाजेपासून होत असे. दिवसाचे १६ ते १७ तास काम करून ते नागरिकांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा करीत असत. दादांची प्रशासनावर असलेली पकड व कार्यतत्परता राज्यभरात प्रसिद्ध होती. आजच्या राजकीय परिस्थितीत शब्दाला जागणारा नेता म्हणून दादांची राज्याला ओळख होती. त्यांचे कार्य सामान्य जनतेच्या मनात कायम कोरलेले राहील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी शेखर देशमुख यांनीही आपल्या भावना व्यक्त करत “दादा आज आपल्यातून निघून गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” अशी भावना व्यक्त केली. उपस्थितांचे मन यावेळी गहिवरून आले. हा श्रद्धांजली कार्यक्रम दि. २८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता चौघुले प्लॉट, हनुमान मंदिर चौक, जळगाव येथे जनसेवा विचारधारा फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरालालबापू वाणी व डॉ. राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास तिवारी, मधुकर चौधरी, राजेश सपकाळे, विजय सोनवणे, राजू मिस्तरी, सचिन ठाकूर, पप्पू पाटील, दिलीप सावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शारदाताई बोरा, योगिताताई चौधरी, रेखाताई गवळी, उमेश भालेराव, बापू कोळी, शेखर देशमुख, महेश भालेराव, सागर सोनार, मानव चौधरी, नथ्थू बोरसे, संदीप पाटील, नाना महाजन, राजेश गवळी, सचिन चौधरी, सतीश चौधरी, कवी प्रकाश पाटील, प्रल्हाद चौधरी, मुरलीधर सपकाळे, संजय वाणी, लक्ष्मण पाटील, रविंद्र पी. चौधरी, महेश गायकवाड, नरेंद्र चौधरी, घनश्याम गवळी, विठ्ठल सावळे, कृष्णा गवळी, राजू कुमावत, रविंद्र मराठे, अमोल चौधरी आदींनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
टिप्पणी पोस्ट करा