जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीबाबत कठोर भूमिका घेतली असून, पक्षविरोधी हालचाली केल्याच्या आरोपावरून तब्बल २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ही धडक कारवाई करत, पक्षाच्या अधिकृत निर्णयांना न जुमानता बंडखोरीची भूमिका घेणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय
महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांना छेद देणाऱ्या कृती केल्याचे निदर्शनास आले होते. अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणे, संघटनात्मक कामकाजात अडथळे निर्माण करणे तसेच पक्षशिस्त मोडणे, अशा तक्रारी कोअर कमिटीसमोर मांडण्यात आल्या. यावर सखोल चर्चा झाल्यानंतर संबंधित सर्वांचे प्राथमिक सदस्यत्व व पदे तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजपची स्पष्ट भूमिका
“पक्षाची शिस्त, धोरणे आणि संघटनात्मक बांधिलकी ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. शिस्तभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पक्षाच्या हितासाठी घेण्यात आला असून, तो त्वरित अंमलात आणण्यात आला आहे,” असे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.
पक्षातून हद्दपार करण्यात आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते :
1. पाटील संगीता गोकुळ
2. हर्षदा अमोल सांगोरे
3. बाविस्कर धनश्री गणेश
4. बाविस्कर गणेश दत्तात्रय
5. सपकाळे रंजना भरत
6. कांचन विकास सोनवणे
7. शिंपी प्रमोद शांताराम
8. सपकाळे भरत शंकर
9. बागरे हिरकणी जितेंद्र
10. चौधरी चेतना किशोर
11. बारी मयूर श्रावण
12. पाटील तृप्ती पांडुरंग
13. पाटील सुनील ज्ञानेश्वर
14. विकास प्रल्हाद पाटील
15. भोळे गिरीश कैलास
16. कैलास बुधा पाटील (सूर्यवंशी)
17. हेमंत सुभाष भंगाळे
18. जितेंद्र भगवान मराठे
19. प्रिया विनय केसवानी
20. चौधरी रूपाली स्वप्नील
21. अंजू योगेश निंबाळकर
22. चौथै मयुरी जितेंद्र
23. वंजारी जयश्री गजानन
24. पाटील ज्योती विठ्ठल
25. घुगे उज्वला संजय
26. ढाकणे दिनेश मधुकर
27. मोरे कोकीळा प्रमोद.
टिप्पणी पोस्ट करा