जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. भल्या पहाटे अशी दु:खद बातमी ऐकायला मिळेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. अजितदादा पवार हे अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि तरुण कार्यकर्त्यांसाठी कायम आधारवड ठरले होते.
कार्यकर्त्यांवर निस्सीम प्रेम करणारे आणि संघटन मजबूत ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून अर्थ व नियोजन मंत्री म्हणून त्यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. स्पष्टवक्ता, प्रचंड निर्णयक्षमता आणि निडरपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण होते.
अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने तरुण कार्यकर्त्यांचा आधारस्तंभच कोसळला असून राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी भरून न निघणारी आहे, असे मत जिल्हा सरचिटणीस भाजपा डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा