जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात नियोजित असलेल्या दोन महत्त्वाच्या परीक्षांच्या दिनांकात बदल करण्यात आला आहे. गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा पूर्वी २१ डिसेंबर २०२५ रोजी २३ केंद्रांवर होणार होती, तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही ४ जानेवारी २०२६ रोजी १४ केंद्रांवर होणार होती.
आयोगाने ८ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकान्वये या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ४ जानेवारी २०२६ रोजी आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली असून उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकानुसार तयारी करावी, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा