Top News

रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शिबिरासाठी आरोग्यदूत शिवाजी पाटलांचा पुढाकार

आतापर्यंत साडेचार हजार रुग्णांना मिळाला लाभ 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I येथील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने जामनेरसह रावेर व यावल तालुक्यात ४५०० गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न झाल्या आहेत. रुग्णांनी याबाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. 

आज अनेक रुग्णांना डोळ्यांच्या विविध समस्या जाणवत आहेत. अनेकांना मोतीबिंदू आहे, मात्र त्यांना वैद्यकीय खर्चामुळे शस्त्रक्रिया करायला वेळ मिळत नाही. अशा अनेक गरजू रुग्णांना राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व यावल-रावेर मतदारसंघाचे आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यदूत पैलवान शिवाजी पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागात नेऊन तपासणी केली. 

ज्या रुग्णांना मोतीबिंदूची शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ वर्षात जामनेर तालुक्यातील ३९०० पेक्षा अधिक रुग्णांनी तर यावल-रावेर तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. शिवाजी पाटील यांच्या या कार्याचे मंत्री गिरीश महाजन, आ. अमोल जावळे आणि कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने