Top News

अयोध्या प्रवासात जळगावच्या भाविकांचा भीषण अपघात, एक महिलेला जीव गमवावा लागला

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अयोध्येतील सुलतानपूरजवळ जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई पाटील (वय 55) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अंदाजे 25 ते 30 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कल्याणी खुर्द येथील 30 महिला व 5 पुरुषांचा भाविकांचा समूह अयोध्या–प्रयागराज देवदर्शनासाठी गेल्याचे सांगितले जाते. हे सर्वजण जळगावहून रेल्वेने वाराणसी येथे पोहोचले होते. त्यानंतर बसने प्रयागराजकडे जात असताना सुलतानपूर परिसरात अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच जळगावचे जिल्हाधिकारी तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयागराज प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून मदतकार्याचा आढावा घेतला आहे. सध्या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना लवकरात लवकर रेल्वेने जळगावात परत आणण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने