शिक्षण, व्यापार व सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे प्रभागात विश्वासाचे नाते
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मधून इच्छुक उमेदवार म्हणून जितेंद्र सुभाष चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे श्री आर्टस् महाविद्यालयाचे संचालक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच ते भारतीय जनता पार्टीच्या व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष म्हणूनही सक्रिय असून व्यापारी वर्गाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेताना दिसतात.
जितेंद्र चव्हाण हे गेल्या तब्बल ३० वर्षांपासून प्रभाग क्रमांक ७ मध्ये वास्तव्यास असून, येथील नागरिकांच्या समस्या, गरजा व अपेक्षा त्यांना जवळून माहिती आहेत. शिक्षण, युवक मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना मदत, तसेच सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी प्रभागात आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे.
दरम्यान, त्यांच्या पत्नी सौ. कल्पना जितेंद्र चव्हाण याही प्रभाग क्रमांक ७ मधून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. सौ. कल्पना चव्हाण यांनी महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य जनजागृती, तसेच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. महिलांच्या समस्या, कुटुंबकल्याण व सामाजिक समतोल यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
चव्हाण दांपत्याचे शिक्षण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण आहे. “विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचे प्रश्न” या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
३० वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे प्रभागातील प्रत्येक घटकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून, अनुभव, कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर ते आगामी निवडणुकीत सक्षम पर्याय ठरू शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा