जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम (अमळनेर पोलीस स्टेशन) यांच्या सूचनेनुसार अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे.
पो.उप.नि. शरद काकळीज, पोका प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, पोका नितीन मनोरे, उज्वल पाटील व हितेश बेहरे यांनी अमळनेर परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरींच्या प्रकरणांचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व डम्प डेटा यांच्या आधारे चोरी करणारे इसम हिमंत रेहज्या पावरा व अंबालाल भुरट्या खरडे (दोघे रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांना धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागातून ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी अमळनेर तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या कबुलीजबाबावरून सातपिंप्री (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जंगल परिसरात लपविलेल्या एकूण 24 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत ₹15,63,000 इतकी आहे. जप्त मोटारसायकलींमध्ये होंडा कंपनीच्या युनिकॉर्न, शाईन, टीव्हीएस रायडर, बजाज पल्सर, हीरो स्प्लेंडर आदी विविध कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे.
सदर आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 308/2025, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/2947 काशिनाथ पाटील व पोकॉ/522 सागर साळुंखे हे करीत आहेत. या कारवाईमुळे अमळनेर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलीस दलाच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा