जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जळगाव शहर संघटनेत नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत गौरव डिगंबर डांगे यांची जळगाव शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल गौरव डांगे यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी या विश्वासाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणी यांचे आभार मानले असून, विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रसंगी पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. डांगे यांच्या नियुक्तीमुळे जळगाव शहरातील विद्यार्थी चळवळ आणखी जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा