Top News

जळगाव रेल्वे स्टेशनजवळ व्यावसायिकाला जुन्या वादातून मारहाण

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेलच्या जुन्या खरेदी–विक्री व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा उग्र परिणाम म्हणून एका व्यावसायिकावर करण्यात आलेल्या मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सायंकाळी घडली असून जखमी व्यावसायिक खूबचंद साहित्य यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल के.पी. प्राईडच्या खरेदी–विक्री व्यवहारावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता या वादाला हिंसात्मक वळण मिळाले आणि काही जणांनी खूबचंद साहित्य यांच्यावर हल्ला चढवून जबर मारहाण केली.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. जखमींचा जबाब घेतल्यानंतर गुरुवारी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत देवेंद्र उर्फ छोटू पवार, निखिल आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथक आरोपींच्या तपासासाठी प्रयत्नशील असून लवकरच संबंधितांना अटक करण्यात येईल, अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने