Top News

अजिंठा चौकात डंपरची जोरदार धडक; मामासह ४ वर्षीय भाची गंभीर जखमी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील अजिंठा चौक परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार मामासह त्यांची चार वर्षीय भाची गंभीररित्या जखमी झाली. डंपर चालकाच्या बेफाम वेग व दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन शांताराम सुर्यवंशी (वय ३३, रा. गजानन पार्क, कुसुंबा) हे त्यांच्या भाची वैष्णवी वानखेडे (वय ४) हिला घेऊन दुचाकीवरून कुसुंबा येथून जळगाव शहराच्या दिशेने येत होते. ते अजिंठा चौकातून जात असताना समोरून येणाऱ्या डंपर (क्रमांक – MH 19 CY 9325) वरील चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव वेगात वाहन दुचाकीच्या उजव्या बाजूस जोरदार धडकवले. या भीषण अपघातात पवन सुर्यवंशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना तसेच कमरेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. तर लहानगी वैष्णवीच्याही दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डंपर चालकाविरोधात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने