जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सकल जैन श्री संघतर्फे दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या तीर्थंकर प्रभु महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचा २०२६ सालचा अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ रतनलालजी बाफना यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निर्णयाचे उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
महोत्सव २०२५ च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित सभेत सुरेशदादा जैन, अशोकभाऊ जैन, नयनताराजी बाफना, प्रदीप रायसोनी, सुशील बाफना, मनीष जैन, कस्तूरचंद बाफना, ललित लोडाया, आशीष जैन, नवरतमल चोरडीया, डॉ. विजयराज कोटेचा, विजय मलारा, कांतीलाल कोठारी, भंवरलाल संघवी, सुदीप मुथा यांसह जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत राजकुमार सेठिया यांनी गेल्या वर्षीच्या महोत्सवाची प्रस्तावना व कार्याचे कौतुक व्यक्त केले. महेंद्र जैन यांनी लेखाजोखा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वरूप लुंकड यांनी केले.
सभेत २०२६ च्या महोत्सवासाठी सिद्धार्थ बाफना यांच्या नावावर सर्वांच्या एकमताने निर्णय झाला. घोषणेप्रसंगी उपस्थित भाविकांनी आनंद व्यक्त केला. सभेला जैन समाजातील बंधू–भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा