Top News

जळगावात जागतिक बेघर दिन सप्ताह उत्साहात साजरा

१ ते १० ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्रात दिनांक १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जागतिक बेघर दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. 

या उपक्रमाचे मार्गदर्शन जळगाव शहर महानगरपालिकेचे मा. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अति. उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, शहराध्यान व्यवस्थापक गायत्री पाटील तसेच मंडळाचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सप्ताहभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. ३ व ४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण निवारा केंद्रात स्वच्छता व साफसफाई मोहिम राबविण्यात आली. ५ व ६ ऑक्टोबर रोजी बेघर लाभार्थ्यांचे विविध भागात सर्वेक्षण करण्यात आले. ७ व ८ ऑक्टोबर रोजी लिंबू-चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची, सांस्कृतिक कार्यक्रम व दांडिया यांचे आयोजन करण्यात आले. ८ ऑक्टोबर रोजी संजय गांधी योजना तसेच इतर शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण निवारा केंद्राचे निजंतुकीकरण करण्यात आले तसेच लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व औषधोपचार कार्यक्रम घेण्यात आला. १० ऑक्टोबर रोजी जागतिक बेघर दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी फुगे, पताका लावून, केक कापून आणि “आनंद नगरी” कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. समारोप कार्यक्रम मा. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते पार पडला. या यशस्वी आयोजनासाठी निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, सौ. शितल काटे आणि किरण मोरे यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने