Top News

तेजस कुमावतचा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I बुधवार, दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी शिरपुर येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत तेजस कुमावत याने विजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तेजसची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा 14 डिसेंबर 2025 रोजी हरियाणातील कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी येथे पार पडणार आहे.

तेजस हा आरुणामाई फार्मसी कॉलेज, शिरपुर येथील बी.फार्मसीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून, याआधी त्याने स्टेट लेव्हल स्पर्धेत दोन वेळा ब्रॉन्झ पदक जिंकले आहे. तसेच, तो राष्ट्रीय स्तरावर एकदा भारताचे प्रतिनिधित्व करून आला आहे. यंदा त्याची नॅशनल स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड झाली आहे, ही बाब शिरपुर आणि महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.

तेजसच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शशिकांत बर्हाटे सर, क्रीडा संचालक माधुरी नारखेडे मॅडम, तसेच बॉक्सिंग कोच श्री. निलेश बाविस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.

त्याचे प्रेरणास्थान त्याची आई अॅड. भारती कुमावत, तसेच वडील श्री. ज्ञानेश्वर कुमावत (मुख्याध्यापक, पी.एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय) आणि भाऊ रीतीक कुमावत (बी.ए. एल.एल.बी.) यांनी नेहमीच त्याचे मनोबल उंचावले आहे.

तेजसच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनंत कोटी शुभेच्छा! 🥊🇮🇳

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने