Top News

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत सुरू असलेल्या गैरप्रकारासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील विविध नियमबाह्य व वादग्रस्त निर्णयांविरोधात सभासदांचा संताप वाढला असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक व जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी चा अधीक्षक महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृह नाव देण्याची मागणी
पतपेढीच्या नवीन इमारतीमधील हॉलला "छत्रपती शिवाजी महाराज सभागृह" हे नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन अधीक्षकांना सादर करण्यात आले.

वादग्रस्त ठराव रद्द करण्याची मागणी
दिनांक 27/09/2025 रोजी झालेल्या मासिक सभेत आयत्यावेळी मंजूर करण्यात आलेल्या एका ठरावाविरोधातही आवाज उठवण्यात आला. सदर ठरावाअंतर्गत माजी अध्यक्ष यांचा मोठा छायाचित्र (फोटो) दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात अपहारासंदर्भातील तक्रारी सध्या सहकार न्यायालयात प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर असा फोटो लावणे म्हणजे भविष्यात पतपेढी कोणते आदर्श उभे करणार आहे. याबद्दल संभ्रम निर्माण करणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
महापुरुषांचे फोटो दर्शनी भागात लावावेत
सद्यस्थितीत महापुरुषांचे फोटो कार्यालयीन अधीक्षकांच्या बंदिस्त खोलीत ठेवलेले असून, ते सन्मानाने दर्शनी भागात लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त माजी अध्यक्षांची पतपेढीच्या कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात येऊ नये
पतपेढीच्या विविध पदांवर माजी अध्यक्ष,संचालक यांची सेवानिवृत्तीनंतर कोणतीही नेमणूक करण्यात येऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. त्यांच्याविरोधात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणं लक्षात घेता, त्यांच्या पुन्हा कार्यलक्षी संचालक वा इतर पदांवरील नेमणुकीने व हस्तक्षेपामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.

सीसीटीव्ही ॲक्सेस माजी अध्यक्षांकडून काढून घ्यावा
कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार पतपेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ॲक्सेस आजही माजी अध्यक्षांकडे असल्याची बाब समोर आली असून, हे अधिकार तत्काळ विद्यमान अध्यक्ष सौ. सोनम शिवाजी पाटील यांच्याकडे देण्यात यावे
कार्यालयात कार्यालयीन वेळेनंतर होणारी खाजगी कार्यक्रमांची चौकशी करावी व ते तात्काळ बंद करावे, कार्यालयीन वेळेनंतर पतपेढीच्या कार्यालयात काही विशिष्ट सभासदांकडून वाढदिवसासारखे खासगी कार्यक्रम साजरे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गोपनीयता भंग होण्याची भीती निर्माण झाली असून, भविष्यात घडणाऱ्या कुठल्याही अनुचित प्रकारास विद्यमान संचालक मंडळ व अधीक्षक जबाबदार राहतील, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. सुरेश अहिरे, तुळशीराम सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने