जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील कोल्हे हिल्स, वाघनगर परिसरातील श्री साईधाम मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाच दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमांची सांगता आज श्री साईबाबांच्या महाआरतीने करण्यात आली.
शेवटच्या दिवशी श्री साईबाबांच्या महाआरतीचा मान साई मल्टी सर्व्हिसेसचे संचालक प्रविण पाटील यांना लाभला. संध्याकाळी नेमक्या ७.३० वाजता झालेल्या या महाआरतीला परिसरातील नागरिक व साईभक्तांची मोठी उपस्थिती होती. आरतीच्या वेळी वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत भरले होते.
यापूर्वी दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाप्रसादाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. सर्वांनी शांततेत आणि श्रद्धेने महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
पाच दिवस चाललेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळा, भजन, किर्तन, आरती व सजावट यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या पाच दिवसांच्या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व साईभक्तांना व उपस्थित नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यातही अशाच प्रकारे भक्तीभाव जपण्याचे आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा