Top News

जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनची टीम ‘मुख्यमंत्री चषक’ स्पर्धेसाठी सज्ज!

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनची टीम नागपूर येथे 26 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणाऱ्या “मुख्यमंत्री चषक” राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या संघांमध्ये तीव्र स्पर्धा होणार आहे.

जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन ही मान्यताप्राप्त संस्था असून, संघाचा सहभाग हा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी, सचिव गोविंद मत्तुकुमार आणि कार्यकारिणी सदस्य निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता पायोनियर स्पोर्ट्स असोसिएशन, जळगाव येथे जिल्हा संघाच्या निवड चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांमध्ये तब्बल 43 खेळाडूंनी सहभाग घेतला. निवड प्रक्रिया फिबा रेफरी आणि एनआयएस कोच सोनल हटकर, तसेच मयूर लहोरी आणि सागर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंना जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विशू मिलवाणी, सचिव निलेश पाटील, तसेच प्रकाश पाचपांडे, विजय बेंडाले आणि रूपेश जगताप यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत यशस्वी कामगिरीसाठी प्रोत्साहन दिले.

संघातील प्रत्येक खेळाडू राज्यस्तरावर जळगावचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने