Top News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पूर्ण

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तांबापुरा पंचशील नगर, फुकटपुरा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. यासाठी ५ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अशोक नकाते यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. अखेर या मागणीचा पाठपुरावा यशस्वी ठरला असून, संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

स्मारक परिसर ओपन असल्याने कोणतीही विटंबना किंवा अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील होते. या मागणीसाठी पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम सोनू सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते इस्माईल भाई खान, आसिफ शाह व बापू जमील शेख यांनी सक्रिय भूमिका बजावली.

मागणीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक अशोक नकाते, शहर डीवायएसपी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आढाव व गोपनीय विभागाचे प्रदीप पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कामाबद्दल पंचशील नगर व फुकटपुरा परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. "आमची मागणी पूर्ण केल्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासन व पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभारी आहोत," असे नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने