जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज मेहरुण तलावावरील विसर्जन स्थळ तसेच विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान गणेश मंडळांना होणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. वाहतुकीची व्यवस्था, विजेची सोय, पथदिवे, सुरक्षेची उपाययोजना, तलाव परिसरातील स्वच्छता आदी महत्त्वाच्या बाबींवर अधिकारी वर्गाने चर्चा केली.
या वेळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, पोलीस उपअधीक्षक नितीन घनापुरे, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, संबंधित पोलीस निरीक्षक, महावितरणचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या या पाहणीमुळे विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शांततेत पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा