जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अन्नदाता हनुमान मंदिर, साई प्रसाद कॉलनी, मेहरूण येथे शिव साम्राज्य शैक्षणिक व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत महिलांनी पारंपरिक, संस्कृती दर्शविणाऱ्या तसेच नवनवीन कल्पकतेतून सुंदर रांगोळ्या साकारत उपस्थितांचे मन मोहून टाकले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक निकिता भोई, रिया मिरगे आणि चंचल भंगाळे यांनी मिळवून आपला ठसा उमटविला. विजेत्या स्पर्धकांना मंडळाकडून गौरविण्यात आले.
शिव साम्राज्य शैक्षणिक व सांस्कृतिक मित्र मंडळ साई प्रसाद सोसायटी, मेहरूण – जळगाव यांच्यावतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच परंपरेत महिलांसाठी या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये कलागुणांना वाव मिळाला असून, परिसरात उत्सवी व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा