Top News

शिंपी समाजातील ज्ञानज्योती व जीवन ज्योती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I: शिंपी समाजाच्या वतीने आयोजित ज्ञानज्योती व जीवन ज्योती पुरस्कार वितरण सोहळा श्रीराम शाळा हायस्कूल, मेहरुण येथे दिनांक ३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याचे हे अखंड परंपरेचे वर्ष असून ज्ञानज्योती पुरस्काराचे २९ वे वर्ष तर जीवन ज्योती पुरस्काराचे २४ वे वर्ष यंदा संपन्न झाले.

स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार

जीवन ज्योती पुरस्कार : सुकलाल देवचंद शिरसाठे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. या पुरस्काराअंतर्गत दरवर्षी नगरपालिका व जिल्हा परिषदेतील निवडक शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. तसेच ललित भास्कर शिंपी यांच्या स्मरणार्थ चित्रकला साहित्याचे वाटप करण्यात आले.

ज्ञानज्योती पुरस्कार : शांताराम सुकलाल शिरसाठे यांच्या स्मरणार्थ शिंपी समाजातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येतो.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव ज्ञानज्योती स्मृतीचिन्ह व संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जीवनचरित्र देऊन करण्यात आला.

सन २०२४ मधील गुणवंत विद्यार्थिनींमध्ये सौ. दिपाली भूषण जगताप (डीएड विशेष प्राविण्य) व कु. मानसी हेमंत खैरनार (दहावी – ८१.४०%) यांचा सन्मान झाला.

सन २०२५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चि. गौरव अविनाश शिंपी (दहावी – ९१.२०%), चि. प्रतीक योगेश नेरपगार (बारावी – ७९.३३%), कु. यशश्री अविनाश शिंपी (बारावी – ७७.६७%) व कु. कोमल संजय शिंपी (बी.ई. सिव्हिल) यांचा गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डी. डी. जोशी (मुख्याध्यापक, श्रीराम शाळा मेहरुण) होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ढाके मॅडम, श्रीमती तायडे मॅडम तसेच श्रीमती मीनाताई शिरसाठे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. मान्यवरांचा सत्कार सौ. रश्मी शिरसाठे, भूषण जगताप व सिंधुताई खैरनार यांनी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आयोजक राकेश शिरसाठ यांनी केले. अध्यक्षीय भाषणासह श्रीमती ढाके मॅडम व श्री. संजय शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन अभेद्या फाऊंडेशनच्या संचालिका सौ. वैशाली झाल्टे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी हेमंत खैरनार, गौरव शिरसाठे, योगेश नेरपगार, भूषण जगताप, साक्षी शिरसाठे, अविनाश शिंपी व अशोक खैरनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने