जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात महिला वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी व्यसनमुक्ती व महिला सशक्तिकरण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध मार्गदर्शक डॉक्टर लीना पाटील यांनी विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीबाबत सविस्तर माहिती दिली.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “सध्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये वाढत चाललेले व्यसन ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हे भविष्यात मोठ्या संकटाचे रूप धारण करू शकते.” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी व डॉ. मनिषा जगताप यांनी विशेष सहकार्य केले.
या वेळी हरिता विसावे, प्रिया महाजन, वेदिका चौधरी, जयश्री महाजन, आस्था पाटील, वैशाली जोशी, ज्योती नवाल, अमृता सोनवणे, कविता नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्ती व महिला सशक्तिकरणासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा