जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा १३ वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर करण्यात आले आहे.
या निवड चाचणीसाठी ०१/०१/२०१२ नंतर जन्म झालेले खेळाडू पात्र असतील. खेळाडूंनी चाचणीस उपस्थित राहताना आधार कार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच वयाचा दाखला यांची साक्षांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
या निवड चाचणीतून अंतिम करण्यात येणारा जळगाव जिल्हा संघ सोलापूर येथे होणाऱ्या १३ वर्षाखालील आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जितेंद्र शिंदे व निलेश पाटील यांनी केले असून, ही माहिती महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव जयंत देशमुख यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा