जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे, तर कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र कलाध्यापक महामंडळाचे पी. ए. पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे यांच्या संयोजनाखाली ११ ऑगस्ट रोजी भुसावळ येथे झालेल्या सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला.
प्रा. शरद पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतरांच्या एकूण १६ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी बी.जे.पी. शिक्षक आघाडीचे राज्य पदाधिकारी व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्र. ह. दलाल होते.
बैठकीची सुरुवात समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून केली. यानंतर मावळते अध्यक्ष नारायण वाघ यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळातील समितीच्या कार्याचा आढावा सादर केला. समितीच्या बळकटीकरणासाठी सदस्य विनोद महेश्री, आर. एस. अडकमोल यांनी विविध सूचना मांडल्या, तर ज्येष्ठ मार्गदर्शक पी. एस. सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, शुद्धोधन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
समितीच्या सूचनेनुसार, अध्यक्ष नारायण वाघ व कार्याध्यक्ष गोविंदा पाटील यांच्या दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर नूतन पदाधिकारी म्हणून गिरीश नेमाडे (अध्यक्ष) व पी. ए. पाटील (कार्याध्यक्ष) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत बामणोद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आर. एस. अडकमोल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला प्रतिनिधी सुनीता पाटील व सुनिता खडके यांचाही गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात प्र. ह. दलाल यांनी शिक्षण क्षेत्रातील विद्यमान समस्या, त्यावरील उपाययोजना व कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले.
या वेळी शिक्षक मित्र शैलेंद्र उर्फ छोटू खडके, उपाध्यक्ष आर. एस. पाटील (जळगाव), देवेंद्र तायडे (भुसावळ), पी. बी. नरवाडे (बोदवड), प्रभाकर बोरसे (वरणगाव), सचिव एस. एस. अहिरे (भुसावळ), सहसचिव कृष्णराव विसावे (पारोळा), खजिनदार सुनील वानखेडे (भुसावळ), प्रसिद्धीप्रमुख प्रवीण धनगर (जळगाव), डी. एस. पाटील (जामनेर), संजय पाटील (भडगाव), महिला प्रतिनिधी सुनिता खडके, सुनीता पाटील तसेच कार्यकारी सदस्य संतोष कचरे, विनोद महेश्री, विकास चौधरी, प्रा. शरद पाटील, नितीन भालेराव, प्रदीप सोनवणे, विनोद पाटील (पारोळा), कुमार मगर (चाळीसगाव), किरण पाटील (चोपडा), गजानन कंखरे (पाचोरा), अनिल अहिरे (धरणगाव), चंद्रकांत देशमुख (रावेर), बी. डी. शिरसाट, हेमंत सावकारे, किरण तायडे, किशोर भाऊ घुले, प्रवीण गुरव व मार्गदर्शक डॉ. संजू भटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा