Top News

जळगावात पावसाची रिपरिप कायम; जिल्ह्यातील अनेक भाग भिजले

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
जळगाव शहरात आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिपीने वातावरण प्रसन्न झाले आहे. दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि हलक्या सरींनी सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत शहरात आणि आसपासच्या भागात पावसाचा क्रम सुरूच होता.

जिल्ह्यातील भुसावळ, पाचोरा, चोपडा, यावल, एरंडोल, अमळनेर आणि धरणगाव या भागांमध्येही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अनुभव नागरिकांना आला. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग पावसामुळे आनंदित झाला असून खरीप पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

मागील काही दिवस उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने