जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I बुधवार, दि. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित नाभिक हितवर्धक संघ, जळगाव शहर संघटनेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव संत गाडगेबाबा उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी 10 वाजता ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पूजन, माल्यार्पण व आरती करून श्री संत सेना महाराजांच्या जीवनचरित्राची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्यातर्फे पुरविण्यात आलेल्या कदंबाच्या रोपांचे वृक्षारोपण श्री प्रभाकर खर्चे, वसंत पाटील आणि हितेश चिरमाडे यांच्यासह नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, जीवा सेना प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हाध्यक्ष किशोर वाघ, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
महिला मंडळातील संगीता गवळी, छाया कोरडे, विद्या महाले, मीना पवार, मंगला इसे, आशा चित्ते, छाया निकम, सरला सूर्यवंशी, वर्षा निकम, मीराताई सोनवणे आदी बहिणींचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषजी कुवर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर सचिव अनिलजी निकम यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा